गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कांद्याचे भाव पडले ऐकूण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

जबरदस्त घटना घडली आहे, यात्र राज्यात आणि देशातील जिल्ह्यात कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण दिसून येथे आहे.  त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहे. कांद्याला भाव न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा हादरा बसतो आहे. यामध्ये  शेतकऱ्याचा कांद्याला भाव न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना मध्ये प्रदेश येथील मंदसौर कृषी समितीत घडली आहे. 
 
शेतकरी भेरूलाल मालवीय (40) हे मंदसौर कृषी समितीमध्ये आपला 27 क्विंटल कांदा विकण्यासाठी घेऊन आले. मात्र  कांद्याला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याला ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
 
 यामध्ये भेरूलाल  मंदसौर जिल्ह्यातील मल्हारगड तहसीलच्या उजागरिया गावचे रहिवासी आहेत. 27 क्विंटल कांद्याला 372 प्रतिक्विटल दराने फक्त 10,045 रुपये मिळाले. हाती आलेले पैसे घेऊन ते घरी निघाले होते. परंतु, त्यांना कृषी समितीच्या आवारात ह्रदयविकाराचा झटका आला आहे. भेरूलाल यांच्यासोबत त्यांचा मुलगा रवी सुद्धा आला होता. रवीच्या समोर त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भेरूलाल यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारने काही मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. कांद्याचा भाव हा प्रति 50 रुपये क्विंटल ते 800 रुपये प्रति क्विंटल विकला जात आहे.