मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (09:24 IST)

शरजिल उस्मानी यांच्यावर गुन्हा दाखल करा, भारतीय जनता युवा मोर्चाकडून तक्रार

File a case against Sharjeel Usmani
अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांनी एल्गार परिषदेत ‘हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है’ आणि भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत ’मी भारतीय संघराज्य मानत नाही’ अशी प्रक्षोभक विधान करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांची ही विधाने भारतीय दंडसंहितेच्या 153अ व 295अ तसेच 124अ या कलमांनुसार गुन्हा ठरणारी आहेत. त्यामुळे उस्मानी यांच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी असा तक्रार अर्ज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनला दिला आहे. शनिवारी (दि.30) गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोलीस परवानगीनुसार, एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते.