शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (15:55 IST)

मुंबई वांद्रे येथील झोपडपट्टीत भीषण आग ५० पेक्षा अधिक झोपड्या खाक

वांद्रे येथील नर्गिस दत्त नगरमधील झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अजून पुढे आले नाही. अग्निशमन दलाचे पथक आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.आगीत ५० ते ६० झोपड्या जळून खाक झाल्या असून, अद्याप तरी आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी दिली. अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी पोहोचले असून अरुंद रस्त्यांमुळे मोठे अडथळे येत आहेत.
 
वांद्रेमधील गरीबनगर झोपडपट्टीत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही भीषण आग लागली होती. या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले होते. ४ मार्च २०११ सालीही गरीबनगर झोपडपट्टीला आग लागल्यामुळे रहिवासी रस्त्यावर आले होते. या आगी लागतात की लावल्या जातात असे तर्क नागरिक काढत काढत आहेत.