1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 25 मे 2023 (13:22 IST)

केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, पोलीसांचा तपास सुरू

Kannur news
कन्नूर : जिल्ह्यातील चेरुपुझा पडचालील परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. हे सामूहिक आत्महत्येचे आहे की हत्येचे हे कळू शकलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. असे म्हटले जाते की महिलेने दुसरे लग्न केले, त्यानंतर कुटुंबात कलह सुरू झाला.
  
कन्नूर जिल्ह्यातील चेरुवाथूर येथील रहिवासी असलेल्या श्रीजा, तिचा दुसरा पती शाजी आणि त्यांची मुले सूरज (12), सुजीन (8) आणि सुरभी (6) यांचा मृत्यू झाला. तिन्ही मुले श्रीजाच्या पहिल्या पतीची मुले होती. मुलांची हत्या करून दोघांनीही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.पोलिस ठाण्यात बोलावले : डीएसपी केई प्रेमचंद्रन यांनी सांगितले की, आज सकाळी 6 वाजता श्रीजा यांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. कौटुंबिक समस्या असल्याचे दिसून आले. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या दुसऱ्या लग्नानंतर वाद वाढला. त्यामुळे दोघांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. मात्र आज सकाळी श्रीजाने पोलीस ठाण्यात फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डीएसपी केई प्रेमचंद्रन यांनी सांगितले. डीएसपी म्हणाले की, शवविच्छेदन प्रक्रियेनंतरच मुलांची हत्या झाली की नाही हे समजेल.
 
 नातेवाइकांना धक्का : दुसऱ्या लग्नानंतर घरात दररोज वाद व्हायचे. तो हे जीवघेणे पाऊल उचलेल, असे स्थानिकांना वाटले नव्हते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चेरुवथूर येथील मूळ रहिवासी असलेल्या श्रीजा तिच्या माजी पती सुनीलच्या नावावर असलेल्या ठिकाणी राहत होती. शाजी आधीच विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. दोघांनी घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले. स्थानिक लोकांचेही म्हणणे आहे की, परस्पर वाद हे मृत्यूचे कारण असू शकते. श्रीजाच्या घरच्यांनीही शाजीसोबतच्या तिच्या नात्याला आणि लग्नाला विरोध केला होता.