शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (12:05 IST)

बेगूसराय मध्ये एकाच कुटूंबातील चार जणांची हत्या, एक जण गंभीर जखमी

murder
बेगूसराय मध्ये रात्री एक कुटुंब झोपले असतांना धारदार शस्त्राने कुटुंबातील चार सदस्यांचा गळा चिरण्यात आला आहे. यामध्ये पती-पत्नी, मुलीचा मृत्यू झालेला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तसेच एवढेच नाही तर आरोपींनी या चौघांच्या शरीरावर ऍसिड टाकले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बच्छवारा पोलीस स्टेशन परिसरातील रसिदपूर मध्ये असलेले चिरंजीवीपूर गावातील आहे. पोलिसांना घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाली. 
 
सांगितले जाते आहे की, हे कुटुंब गाढ झोपेमध्ये होते. त्यावेळी आरोपींनी घरात घुसून धारदार शस्त्राने पती- पत्नी, मुलगा आणि उलगि यांचा गळा चिरला. तसेच पती-पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले आहे. जिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील चौकशी पोलीस करीत आहे तसेच आरोपींचा शोध असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.