सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (13:25 IST)

55 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, आरोपींना अटक

गुजरातच्या वडोदरा येथे एका 55 वर्षीय महिलेवर काम देण्याचा बहाण्याने तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडितेने मुलीला सर्व प्रकार सांगितल्यावर तिला धक्काच बसला. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

सदर घटना वडोदराच्या खोडियारनगर भागात शुक्रवारी घडली आहे. 55 वर्षीय महिला घर कामाच्या शोधात होती. ती प्रत्येकाला काम आहे का असे विचारात होती. तिला पाहून जवळ उभा असलेला रिक्षा चालक वकील पठाण याने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि तुला एका बंगल्यात काम मिळवून देतो असे म्हणत तिला एका बोलावले नंतर रिक्षात बसवून छानी परिसरातील एका निर्जनस्थानी घेऊन गेला तिथे त्याचे दोन मित्र शकील पठाण आणि चमन पठाण हे दोघे होते. 

काही तरी वेगळे असल्याचे तिला जाणवले आणि तिने याचा विरोध केल्यावर तिला तिघांनी ओढत निर्जन स्थानी नेले. आणि तिच्यावर आळी पाळीने बलात्कार केला. घरी आल्यावर महिलेने तिच्यासोबत घडलेले आपल्या मुलीला सांगिल्यावर मुलीला धक्काच बसला. नंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी रिक्षावाला वकील पठाण आणि त्याच्या दोघे मित्रांच्या विरोधात एफआयआर नोंदवली. पोलिसांनी चार पथके तयार करून आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली.    

Edited By- Priya Dixit