गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: कोलकाता , बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (11:20 IST)

ज्येष्ठ गायिका गिरिजा देवी यांचे निधन

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाले. कोलकाताच्या बिर्ला रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 88 वर्षांच्या होत्या. उत्तर प्रदेशातल्या बनारसमध्ये 8 मे 1929 ला त्यांचा जन्म झाला होता.
 
बनारस घराण्याच्या त्या गायिका होत्या. आपल्या ठुमरी गायनासाठी त्या विशेष प्रसिद्ध होत्या. गिरिजा देवी यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आले होते.