सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (13:26 IST)

एक संधी द्या, भ्रष्टाचार कसा संपवायचा मला माहितीये - केजरीवाल

मी गुजरात जिंकायला आलोय, भ्रष्टाचार कसं संपवायचा मला चांगलंच माहिती आहे. मला फक्त एक संधी द्या, असं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेला केलं आहे. गुजरात येथे शनिवारी आयोजित रोड शोनंतर ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, "राजकारण कसं करायचं ते मला माहीत नाही. पण भ्रष्टाचार कसा संपवायचा ते मला चांगलंच माहिती आहे. आम्ही दिल्लीतील भ्रष्टाचार संपवला. सध्या तुम्ही दिल्लीतील कोणत्याही कार्यालयात गेलात तरी तिथे तुम्हाला लाच देण्याची गरज पडणार नाही. पंजाबात मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दहा दिवसांत भ्रष्टाचार संपवला आहे. तर मग गुजरातमध्ये काय होईल?