1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (18:50 IST)

या ठिकाणी पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता

सध्या उत्तर भारतात पावसाचा जोर कमी झाला आहे.आता दोन वेस्टर्न डिस्टरबेन्स तयार होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
 
पुढील चार ते पाच दिवस उत्तर भारतात दोन वेळा वेस्टर्न डिस्टरबेन्स तयार होण्याची शक्यता असल्यामुळे पहिला वेस्टर्न डिस्टर्बन्स आज आणि उद्या उत्तर भारतात धडकणार असून दुसरा वेस्टर्न डिस्टर्बन्स 17 फेब्रुवारी रात्री पासून 20 फेब्रुवारी पर्यंत धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं दर्शवली आहे. दरम्यान पश्चिम हिमालयात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम मेघसरी कोसळणार. 
 
पण याचा फारसा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. पण तुरळक ठिकाणी तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळच्या किनारपट्टीवर ईशान्येकडील वारे सक्रिय झाल्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस  येण्याची शक्यता असल्यामुळे या भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.