शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 एप्रिल 2018 (11:10 IST)

सीमा भागात १३ हजार बंकर बांधले जाणार

केंद्र सरकारने आता सीमेवर राहणाऱ्या नागरिकांसाठी बंकर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू- काश्मीरमधील सांबा, पुँछ, जम्मू, कठूआ आणि राजौरी या पाच जिल्ह्यांमध्ये जवळपास १३ हजार बंकर बांधले जाणार आहेत. याशिवाय या जिल्ह्यात १, ४३१ मोठे बंकर (कम्यूनिटी बंकर) देखील बांधले जाणार असून एका बंकरमध्ये किमान ४० लोकं राहू शकतील.
 
केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनला (एनबीसीसी) जम्मू- काश्मीरमधील सीमेवर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सीमेपासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांसाठी बंकर बांधण्याचे काम एनबीसीसीला देण्यात आले आहे. १६० चौरस फुटाच्या खासगी बंकरमध्ये ८ ते १० लोकं राहू शकतील. याशिवाय एका कम्यूनिटी बंकरमध्ये ४० जणांना राहता येणार आहे. या कामासाठी ४१६ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहेत.