शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गुजरात विधानसभा निवडणुक, दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण ९३ जागांसाठी निवडणूक लढवत असलेल्या ८५१ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. यावेळी  मतदानासांठी मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचं आवाहन काँग्रेस आणि भाजपकडून करण्यात आलं आहे.
 
एकीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भाजपसाठी सगळा जोर लावला आहे. तर काँग्रेसच्या विजयासाठी राहुल गांधींनीही यंदा जोरदार प्रयत्न केले आहेत. दुसरीकडे पाटीदार नेते हार्दीक पटेल, ओबीसी नेते अल्पेश ठाकोर आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांचाही प्रभाव यंदाच्या निवडणुकीवर दिसतो आहे. या सगळ्याचा मतदानावर काय परिणाम होईल, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.