सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 27 जून 2021 (12:43 IST)

जम्मू एअरफोर्स विमानतळावर ड्रोन बॉम्ब हल्ला आणि 2 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर हाय अलर्ट

जम्मू. दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीने जम्मू विभागात हाय अलर्ट करण्यात आला आहे.असं या मुळे केले आहे कारण आज जम्मू हवाई दल विमानतळावर दहशतवाद्यांनी ड्रोनच्या मदतीने ड्रोनच्या मदतीने स्फोट करून सगळ्यांना चकित केले आहे.या हल्ल्यानंतर लगेचच विमानतळापासून 5 किमी दूर 5 किलो IED सह दोन दहशतवाद्यांना अटक केल्यामुळे अधिकाऱ्यांना हाय अलर्ट जाहीर करण्यास भाग पाडले.
 
विमानतळावरील दोन स्फोटांमध्ये दहशतवादी किंवा ड्रोनच्या वापराची अद्याप अधिकाऱ्यांकडून खात्री पटली गेली नसली तरी आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या लोकांच्या मते त्यांनी पहाटे आकाशात ड्रोन उडण्याची आवाज  ऐकली.आणि नंतर झालेल्या स्फोटांमुळे एका इमारतीचे नुकसान झाले.
 
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जम्मूच्या हवाई दलाच्या विमानतळावर आज (रविवारी) पहाटे दोनच्या सुमारास दोन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात दोन जण किरकोळ जखमी झाले.अरविंद सिंह आणि एलएसी एसके सिंग अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना तातडीने एअरफोर्स स्टेशन जम्मू येथे असलेल्या एमआय रूममध्ये प्राथमिक उपचार देण्यात आले.
 
बॉम्ब पथकासह सैन्य आणि पोलिस विमानतळावर दाखल झाले आहेत. संपूर्ण परिसरात घेराव बंदी केली आहे.विमान तळा मार्गावर कोणालाही येण्याची -जाण्याची परवानगी नाही.विमान तळावर पॅरो कमांडो देखील दाखल झाले आहे.हे कमांडो संपूर्ण घटनेची माहिती घेऊन स्फोटाचे महत्त्वपूर्ण संकेत गोळा करण्यास मदत करतील.
 
पहिला स्फोट विमानतळाच्या इमारतीत झाला तर दुसरा स्फोट अगदी पाच मिनिटानंतर जमिनीवर झाला. घटनेनंतर लगेचच तांत्रिक विमानतळावर येणाऱ्या जाणाऱ्या मार्गाच्या वाहतुकीला बंद केले आहे.
 
हवाई दलाच्या विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून अशा परिस्थितीत बॉम्बस्फोट घडल्याची घटना अनेक प्रश्नांना जन्म देत आहे. पोलिसांनीही विविध बाबींवर काम सुरू केले आहे. आतापर्यंतच्या सुरुवातीच्या तपासात जे समोर येत आहे त्यावरून आज सकाळी विमानतळाच्या आत बॉम्बस्फोट ड्रोनच्या मदतीने करण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावरून शैल देखील ताब्यात घेण्यात आले आहेत. या सिद्धांताची अधिकृतपणे अद्याप पुष्टी केलेली नाही.
 
दरम्यान, जम्मूच्या नरवाल भागात दोन दहशतवाद्यांना 5 किलो आयईडीसह अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या ताब्यातून शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. दहशतवाद्यांना वेळीच अटक करून जम्मू शहरात मोठा दहशतवादी कट रचण्यात आला आहे. पोलिस दहशतवाद्यांची चौकशी करत आहेत.
 
शहराच्या बाहेरील भागात एका प्रमुख शॉपिंग मॉलजवळून जम्मू पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच्या आधारे पोलिसांनी कारवाई सुरू केली. हा हल्ला करण्यापूर्वी हे दहशतवादी शहरातल्या मोठ्या प्रतिष्ठानाची रेकी करत होते.