गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (17:11 IST)

Haidrabad : शिक्षकाने गृहपाठाच्या हाणामारीतून बालवाडीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

child death
Haidrabad :तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गृहपाठ न केल्याने शिक्षकाने बेदम मारहाण केल्याने येथील एका खासगी शाळेतील बालवाडी विद्यार्थ्याचा सोमवारी मृत्यू झाला . हैद्राबादच्या उप्पल येथील शाळेत एका शिक्षकाने मुलाच्या डोक्यावर पाटी  मारल्याने बालवाडीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हेमंत असे या मयत मुलाचे नाव आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत (5) हा मुलगा रामनाथपूर येथील एका खासगी शाळेत बालवाडीच्या मोठ्या गटात  शिकत होता. शनिवारी एका शिक्षकाने मुलाची पुस्तके तपासली असता त्याने गृहपाठ पूर्ण केला नसल्याचे आढळून आले. संतप्त झालेल्या शिक्षकाने पाटी उचलून हेमंतच्या डोक्यात मारले.हेमंत वर्गात कोसळून खाली पडला आणि बेशुद्ध झाला. तातडीनं त्याला रुग्णालयात नेण्यात आले. सोमवारी उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी करत कुटुंबीयांनी शाळा आणि उप्पल पोलीस ठाण्यात निदर्शने केली.सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.



Edited by - Priya Dixit