शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 19 एप्रिल 2017 (11:18 IST)

संपूर्ण अंग झाकणारे कपडे घाला

दिल्लीतील आयआयटी संस्थेच्या वसतिगृहाकडून देण्यात आलेला आदेश सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आयआयटीच्या मुलींच्या वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी येत्या 20 एप्रिलच्या हाऊस डेच्या दिवशी पुर्ण शरीर झाकणार सभ्य पोषाख करावा अशी सुचना देणारी नोटीस लावण्यात आल्याने अनेकांनी त्याला आक्षेप घेतला आहे. त्यातून वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हाऊस डे च्या दिवशी संबंधीत मुलींना आपल्या पालकांना किंवा नातेवाईकांना आपल्या वसतीगृहाच्या आवारात एक तासासाठी आणण्याची अनुमती दिली जाते. हाऊस डे नावाने हा उपक्रम तेथे पाळण्यात येतो आणि वर्षातून एकदा हा दिवस पाळला जातो.
 
त्यासाठी कोणता ड्रेस कोड असावा यासंबंधात मुलींच्या वसतीगृहाच्या नोटीस बोर्डावर आज ही सुचना लावण्यात आली. त्यावरून तेथे वादंग माजवले जात आहे. मागच्या वर्षी आम्हाला ही सुचना तोंडी स्वरूपात सांगण्यात आली होती पण यावेळी प्रथमच अशी लेखी सुचना करण्यात आली आहे ही आश्‍चर्यजनक बाब आहे असे काहीं विद्यार्थिंनीनी म्हटले आहे. काही मुलींनी सोशल मिडीयावर या नोटीशीचा फोटो टाकला असून हा अन्यायकारक व भेदभाव निर्माण करणारा आदेश आहे अशा प्रतिक्रीया त्यांनी नोंदवल्या आहेत.