बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :दंतेवाडा , सोमवार, 9 मार्च 2020 (15:22 IST)

नक्षलवाद्यांशी लढा देतेय 'ही' आठ महिन्यांची गर्भवती

छत्तीसगडचा दंतेवाडा नक्षलवाद्यांचा अड्डा म्हणून ओळखला जातो. त्यांच्यावर वचक राखण्यासाठी येथे कायम सुरक्षा यंत्रणा सतर्क असते. या सुरक्षा यंत्रणेत कार्यरत असणार्‍या जवानांसाठी येथे काम करणे म्हणजे मृत्यू ओढावून घेणेच... परंतु, याच भागात सध्या एक महिला गर्भवती असतानादेखील आपली काम चोख बजावताना दिसतेय. सुनैना पटेल असे या महिलेचे नाव आहे. सुनैना आठ महिन्यांची गर्भवती आहे, परंतु, तिने सध्या लगेचच सुट्टी घेण्यास नकार दिला आहे.
 
'दंतेश्वरी फायटर' सुनैना पटेल छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांशी लढणार्‍या 'डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड'मध्ये 'दंतेश्वरी फायटर' म्हणून सुनैना पटेल कार्यरत आहेत. याआधी एकदा पेट्रोलिंग दरम्यान सुनैना यांना गर्भपाताला सामोरे जावे लागले. परंतु, त्या आपल्या कर्तव्यावरून मागे हटण्यास तयार नाहीत. अत्यंत खडतर आयुष्य जगावे लागणार्‍या भागात अनेक कठीण प्रसंगांना आणि अडचणींना तोंड द्यावे लागत असले तरी सुनैना यांनी कर्त्यव्यावरून मागे हटण्यास नकार दिला आहे. सुनैना दंतेवाडाच्या जंगलात नक्षलवाद्यांविरोधात लढाई लढत आहेत. सुनैना यांचा हानिर्णय त्यांच्यासाठी धोकायदायक असला तो अनेक महिलांना कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी प्रोत्साहन देता आहे.