शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मे 2017 (14:28 IST)

तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा लष्कराकडून कासोचा वापर

भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दहशतवाद्यांविरोधात ‘घेराव घालणे आणि शोध मोहीम’ (कासो ऑपरेशन) तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  कासोचा वापर काश्मीरमधील दहशतवाद प्रभावित कुलगाम, पुलवामा, तराल, बडगाम आणि शोपियां येथे मोठ्या प्रमाणात केला जाईल. स्थानिकांच्या विरोधानंतर कासो ऑपरेशन बंद केले होते. २००१ नंतर गोपनीय माहिती मिळाल्यानंतरच घेराव घालणे आणि शोध मोहीम चालवण्यात आली. अशा अभियानावेळी येणाऱ्या अडचणींमुळे सुरक्षा दल स्थानिक लोकांपासून दुरावले होते, असे सुरक्षा दलांना वाटते. नुकताच काश्मीरमधील युवा सैन्य अधिकारी लेफ्टनंट उमर फयाज यांची शोपियांमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यामुळे लष्कराने कासो ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.