शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 20 जुलै 2019 (10:07 IST)

पहिला गारबेज फॅफे सुरु प्लॉस्टिक कचऱ्याच्या बदल्यात जेवण मिळणार

देशातील पहिला गारबेज फॅफे सुरु करण्यात आला आहे. जेथे लोकांना प्लॉस्टिक कचऱ्याच्या बदल्यात जेवण मिळणार आहे. या कॅफे अंतर्गत नगरपालिका गरीब आणि बेघर लोकांना प्लॉस्टिक कचऱ्याच्या बदल्यात जेवण देणार आहे. तसेच या योजनेच्या लाभ कोणीही घेऊ शकते. विशेष म्हणजे या जमा होणाऱ्या प्लास्टिकमधून रस्ते बनवण्यात येणार आहे. कॅफेला अंबिकापूर शहरातील मुख्य संस्थेला जोडण्यात येईल. या नव्या योजनेअंतर्गत १ किलो प्लास्टिक कचरा आणून दिल्यानंतर लोकांना पोटभर जेवण मिळणार आहे. तर ५०० ग्राम प्लास्टिकच्या कचऱ्यावर पोटभर नाश्ता देण्यात येईल. शहराचे महापौर अजय तिरके यांनी सांगितले की, नुकत्याच महानगरपालिकेअंतर्गत अर्थसंकल्पात कॅफे सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.प्लास्टिकचा वापर रस्ते निर्मितीसाठी अंबिकापूरला इंदौरनंतर देशातील सर्वात स्वच्छ शहर घोषित करण्यात आले आहे. या कॅफेच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर रस्ते बनवण्यासाठी करण्यात येईल. शहरात या आधी देखील प्लास्टिकच्या तुकड्यापासून रस्ते बनवण्यात आले आहेत. या रस्ते निर्माणात ८ लाख प्लास्टिक पिशव्याचा वापर करण्यात आला होता. हे रस्ते इतर रस्त्यांपेक्षा आधिक मजबूत आहेत.