रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2016 (14:49 IST)

शेवटी किती संपत्ती सोडून गेली आहे जयललिता?

68 वर्षाची जयललिता आपल्या मागे लाखो समर्थक आणि अन्नाद्रमुक पार्टीला सोडून गेली आहे.  
आता सामान्य आणि खास लोकांमध्ये चर्चेचा विषय सुरू आहे की त्यांची किती संपत्ती आहे आणि ती कोणाला मिळेल?   
 
सध्या हे स्पष्ट झालेले नाही की कायदेशीर त्यांचा कोणी वारसदार आहे की नाही. म्हणून त्यांची संपत्ती कोणाला मिळेल, यावर लोकांचे   अनुमान लावणे सुरू आहे.   
 
2016च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जयललिता यांनी चेन्नईचे डॉ. राधाकृष्णानं नगर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढले होते.  विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भरण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे जयललिता यांची एकूण  संपत्तीचे मूल्य 113,73,38,586 रुपये एवढे होते.  
 
प्रतिज्ञापत्राप्रमाणे जयललिता यांच्याजवळ प्रतिज्ञापात्र भरताना 41000 रुपये कॅश होते.  
त्याशिवाय बँक खात्यात 10,63,83,945 रुपये जमा होते. जयललिता यांची संपत्तीमध्ये 27,44,55,450 रुपयांचे बांड, डिबेंचर आणि कंपन्यांचे शेअर होते.  
 
पण महत्त्वाच बाब म्हणजे जयललिता यांनी आपला विमा नव्हता करवला होता.  
चल संपत्तीत जयललिता यांच्याजवळ दोन टोयटा प्राडो एसएयूवी, एक कंटेसा, एक एंबेसडर, महिंद्रा बोलेरो आणि महिंद्रा जीप समेच कूल नऊ गाड्या होत्या, ज्यांचे बाजार मूल्य किमान 42,25,000 रुपये एवढे सांगण्यात आले आहे.  
 
जयललिता यांच्याजवळ काही दागिने होते, याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली होती.  
त्यांच्यानुसार जयललितांजवळ सोन्याचे किमान 21280.300 ग्राम (अर्थात किमान 21 किलो सोनं) होत, ज्याला कर्नाटकच्या महसूल विभागाने जब्त केले होते.  
 
त्याशिवाय जयललिता यांच्याजवळ 1250 किलोग्रॅम चांदीचे आभूषण होते, ज्यांचे बाजार मूल्य 3,12,50,000 सांगण्यात आले आहे.  
 
अर्थात एकूण जयललिता यांच्याजवळ 41 कोटीपेक्षा जास्तीची चल संपत्ती आहे. दिलचस्प गोष्ट अशी आहे की जयललिता यांचे एकूण 25 बँकांमध्ये खाते आहे. यात आयपेक्षा अधिक संपत्ती जमा करण्याच्या प्रकरणात त्यांचे सात खाते फ्रीज करण्यात आले आहे.  
 
जयललिता यांच्या सहा बँकांमध्ये एक एक कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे, जेव्हा की दोन खात्यांमध्ये 99-99 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.  अचल संपत्ती प्रमाणे जयललिता पोएस गार्डेनमध्ये राहत होत्या. हे त्यांचे निजी निवास आहे जे किमान 24000 वर्गफ़ीटमध्ये पसरलेले आहे. याचा बिल्टअप एरिया 21,662 वर्ग फीट आहे. याचे बाजार मूल्य 43.96 कोटी रुपये एवढे सांगण्यात येत आहे.  
 
या घराला जयललिताने आपल्या आईसोबत वर्ष 1967 मध्ये किमान 1,32,009 रुपयांमध्ये विकत घेतले होते.  
या घराशिवाय जयललिता यांची अचल संपत्तीत चार कमर्शियल इमारती सामील आहे, ज्यांची ऐकून बाजार मूल्य 13 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
 
त्याशिवाय शेतीच्या नावावर जयललितांजवळ 14.5 एकरचा एक प्लॉट तेलंगणाच्या हैदराबादमध्ये आहे, ज्याचे मूल्य किमान 14.78 कोटी ठरवण्यात आले आहे. हे प्लॉटपण जयललिताने आपल्या आईसोबत वर्ष 1968 मध्ये 1,78,313 रुपयांमध्ये विकत घेतला होता.
 
जयललिताच्या नावावर तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यात 3.43 एकरचा प्लॉट देखील आहे, ज्याचे बाजार मूल्य 34 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.  
 
जयललितांची एकूण अचल संपत्ती 72,09,83,190 रुपयांची आहे. चल आणि अचल संपत्तीला जोडून एकूण संपत्ती 113 कोटी एवढी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात जयललिताने आपला व्यवसाय कृषी सांगितले आहे.  
 
तसं तर जयललितांवर 2.04 कोटी रुपयांचे लोन देखील आहे. त्यांनी हे लोन इंडियन बँकेकडून घेतले होते. जयललिताने बँकेकडून 1.39 कोटी रुपये एवढे लोन घेतले होते, ज्याची देनदारी निवडणुक लढताना 2.04 कोटी रुपये एवढी झाली होती.  
 
जयललिता यांची वसियत होती का? याचा पत्ता अद्याप माहीत पडले नाही आहे. अशात  सर्वात मोठा प्रश्न असा येत आहे की या संपत्तीवर कोणाचा हक्क असेल.  
 
कायदेशीर शशिकला आणि तिचा कुटुंब जयललिता यांच्या संपत्तीवर आपला हक्क दाखवू शकत नाही.  

जयललितांवर वर्ष 1996मध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आयपेक्षा अधिक संपत्ती हासिल करण्याचे प्रकरण दाखल केले होते.  

18 वर्षांनंतर बैंगलुरुच्या विशेष अदालतने 27 सप्टेंबर, 2014ला त्यांना दोषी आढळून चार वर्षांची शिक्षा ठोठावून 100 कोटी रुपयांची शिक्षा दिली होती.  
 
त्यांच्यावर वर्ष 1991-1996च्या दरम्यान पहिल्यांदा मुख्यमंत्री पदावर राहत असताना 66.65 कोटी रुपये (30 किलोग्रॅम सोनं आणि 12,000 साड्या समेत)ची संपत्ती जमा करण्याच आरोप होता. नंतर 11 मे, 2015ला कर्नाटक हायकोर्टाने त्यांना या प्रकरणात मुक्त करण्यात आले होते.