बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (15:07 IST)

देशाचे 47 वे सरन्यायाधिश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे

आकाशवाणीन्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी आज भारताचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकाराला. राष्ट्रपती भवनात आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
आधीचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे काल निवृत्त झाले. न्यायमूर्ती बोबडे यांचा कार्यकाल साधारण 18 महिन्यांचा राहिल. अयोध्या प्रकरणातल्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठातही बोबडे यांचा समावेश होता.