शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पुलवामा हल्ल्या शहीद जवानच्या कुटुंबाला 1 कोटी देणार मप्र सरकार

Kamalnath announce 1 crore ex gratia for soldier martyred in pulwama attack
जम्मू- काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात मध्य प्रदेशातील शहीद जवानच्या कुटुंबाला मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच एक आवास आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देखील देण्यात येईल. या दुःखद वेळी आम्ही शहीद जवानाच्या कुटुंबासह उभे आहोत. असे मुख्यमंत्री यांनी म्हटले. या हल्ल्यात मप्रच्या जबलपूर येथे राहणार्‍या सीआरपीएफ जवान अश्विनी कुमार काछी शहीद झाले.
उल्लेखनीय आहे की गुरुवारी संध्याकाळी पुलवामामध्ये सुरक्षा बळांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला असून त्यात 40 हून अधिक जवान शहीद झाले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले की या भ्याड हल्ल्यात बळी गेलेले जवानांचा बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारत चूप बसणार नाही. त्यांनी हल्ल्याची निंदा करत जवानांना श्रद्धांजली अर्पित केली.