सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2017 (11:20 IST)

लालूंचे पाय आणखी खोलात, सत्ता जाताच गुन्हा दाखल

लालू प्रसाद यादव यांची सत्ता जाताच त्यांच्या मागे आता चोकशी सुरु होणार हे नक्की झाले आहे, नितीश कुमार सोबतची युती तुटताच त्यांच्यावर एक नवीन गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे लालू आता चागलेच अडचणीत सापडले आहेत.राष्ट्रीय जनता दलाचे  लालूप्रसाद यादव यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. रेल्वे हॉटेल वितरणात  यूपीए शासनकाळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी लालू  कुटुंबातील सदस्यांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती समोर आणली आहे. तर  आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे लालू प्रसाद यादव जास्त काळ जेलच्या बाहेर राहतील अशी शक्यता कमी आहे. तर त्यांची परिवाराने सुद्धा मोठा आर्थिक घोटाळा केला असून त्यावर सुद्धा लवकरच कारवाई होणार हे आता जवळपास उघड झाले आहे.