सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

8 पर्वतारोह्‍यांचा शेवटल्या क्षणांचा हृदयविदारक 1 मिनिट 55 सेकंदाचा व्हिडिओ

भारत-तिबेट सीमा पोलिस (ITBP) ने सोमवारी एक व्हिडिओ रिलीज केला आहे ज्यात उत्तराखंडात नंदा देवी पूर्वी शिखराच्या रस्त्यात प्राण गमवणार्‍या 8 पर्वतारोह्यांचे शेवटले क्षण दिसतात.
 
एक मिनट 55 सेकंदाच्या हा व्हिडिओ एका पर्वतारोह्‍याच्या हेल्मेटमध्ये लागलेल्या कॅमेर्‍याने शूट झाला आहे. हा व्हिडिओ मे महिन्यातील त्या वेळीचा आहे जेव्हा पर्वतारोह्यांचा हा गट नंदा देवी पूर्वी शिखराची 7434 मीटरची ऊंची पूर्ण करणार होता.
 
या पर्वतारोह्यांना घसरणार्‍या बर्फाच्या चादरीवर रांगेत उभे असताना बघता येत आहे. याच प्रकारे त्यांना शिखर गाठायचे होते. हा व्हिडिओ एका स्फोटासह संपतो.
 
आयटीबीपीच्या अधिकार्‍यांनी या आवाजाबद्दल म्हटले आहे की हा आवाज हिमवर्षाव किंवा हिम तूफानाची ध्वनी असू शकते, ज्यामुळे त्यांचा जीव गेला असावा. हे पर्वतारोही 25 मे रोजी पासून बेपत्ता होते आणि 3 जुलै रोजी आयटीबीपी कर्मचारी 8 मृतदेह खाली घेऊन आले होते.