रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जुलै 2019 (09:39 IST)

आता रेल्वेचे कोणतेही नियम तोडाल तर तुरंगात सहा महिने पोहोचाल

देशातील सर्वधिक प्रवास करण्यासाठी वापर असलेल्या भारतीय रेल्वेने आता मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेचे नियम जर मोडले तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो किंवा थेट तुरुंगातच जावे लागणार आहे.
 
काही मिनिट वाचवण्यासाठी अनेक महाभाग  जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडत असतो. याकडे रेल्वेने आतापर्यंत दुर्लक्ष केले होते. परंतू जर आता तुम्ही रेल्वे रुळ ओलांडून या प्लॅटफार्मवरुन त्या प्लॅटफार्मवर जाताना दिसलात तर तुम्हाला आता दंडाचा भार सोसावा लागू शकतो सोबतच थेट तुरुंगवास  देखील होणार आहे. रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी कायमच प्रयत्न करते. देशभरात मोठ्या प्रमाणात फुटओवर ब्रिज आणि अंडर ब्रिड रोड बनवण्यात येत आहेत. ज्यामुळे की लोक जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडणार नाहीत. यासाठीच देशभरात मोठ्या प्रमाणात अभियान राबवण्यात येत आहेत. आता त्या नुसार रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांना पकडण्यात येणार आहे खरे तर पूर्वीपासून आपल्याच काय तर पूर्ण जगात रेल्वे रुळ ओलांडणे हे कायद्याने गुन्हा आहे. आपल्या देशातील रेल्वे अधिनियम कलम १४७ च्या अंतर्गत रेल्वेचे रुळ पार करण्याच्या गुन्हात व्यक्तींना पकडण्यात येते. असे करताना कोणही दिसल्यास त्या व्यक्तीला ६ महिन्यांपर्यंत शिक्षा मिळू शकते. त्याच बरोबर १००० रुपयांच्या दंड सोसावा लागतो.
 
रेल्वे रुळ ओलांडताना अनेक लोकांचे मृत्यू होतात. यासाठी मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण करण्यासाठी अभियान सुरु करुन रेल्वे रुळ न ओलांडण्यासाठी प्रेरित केले जात आहे.त्यामुळे आता जर तुम्ही रूळ ओलांडला तर तुम्हाला शिक्षा ही नक्कीच होणार आहे.