शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात: 29 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी

उत्तर प्रदेशमध्ये यमुना एक्सप्रेसवेवर आग्र्याजवळ एका बसला अपघात झाला आहे. या अपघातात 29 लोकांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
 
उत्तर प्रदेश रोडवेजची ही बस लखनौहून दिल्लीला येत होती. आग्र्याजवळ बस झरना नाल्यामध्ये कोसळली.
 
सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
 
आग्र्याचे जिल्हाधिकारी एनजी रवी कुमार, एसएससी बबलू कुमार हे घटनास्थळी उपस्थित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी 29 लोकांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची माहिती घेतली असून मृतांप्रति शोक व्यक्त केल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं आहे. जखमींना तातडीनं वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
 
उत्तर प्रदेश रोडवेजनं मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.