गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (21:31 IST)

माजिद मेमन यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला

माजी खासदार माजिद मेमन यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याची माहिती त्यांनी एका ट्विटमधून दिली आहे. मेमन यांनी आज तीन ट्विट केली होती. यापैकी तिसरे ट्विट शरद पवारांसोबत शुभेच्छा कायम असतील असे म्हटले आहे.
 
माझ्या 16 वर्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील कारकीर्दीत मला सन्मान आणि अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मी आभार मानतो. वैयक्तिक कारणास्तव मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने सोडत आहे. शरद पवार आणि पक्षाला माझ्या सदैव शुभेच्छा, असे ट्विट मेमन यांनी केले आहे.
 
मेमन हे २०१४ ते २०२० या काळात राज्यसभेचे खासदार होते. एप्रिल 2019 मध्ये मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर टीका केली होती. 'मला वाटते की पंतप्रधान मोदी हे अशिक्षित आणि रस्त्यावर फिरणाऱ्या माणसांसारखे बोलतात. एवढ्या मोठ्या पदावर ते बसले आहेत, त्यांचे पद हे घटनात्मक पद आहे. त्या संवैधानिक पदावर जो बसतो त्याला रस्त्यावरून निवडले जात नाही, असे ते म्हणाले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor