मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (16:17 IST)

Political Crisis in Bihar : मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला

बिहारमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आता भाजपला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.
 
2020 ची बिहार विधानसभा निवडणूक जेडीयू आणि भाजपने एकत्र लढवली होती. कमी जागा मिळूनही भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले. तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची सुरू होती. दोन्ही पक्षांचे नेतेही अनेक मुद्द्यांवर वेगवेगळी वक्तव्ये करताना दिसले. आता भाजपसोबत जेडीयूची युती तुटल्याचे निश्चित झाले आहे.
राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीश कुमार यांनी एनडीए सरकारमधील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. भाजपसमोर त्यांच्या एक नाही तर अनेक अडचणी होत्या. त्यांचे नेते नंतर सविस्तरपणे सर्वकाही स्पष्ट करतील. सध्या नितीश तेजस्वी यादव यांच्या घरी पोहोचले आहेत.
 
नितीश कुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. त्यांना 160 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांच्या बाजूने करण्यात आला आहे. राजीनाम्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपपासून वेगळे व्हावे, ही सर्वांची इच्छा असल्याचे म्हटले आहे. आमदार-खासदारांच्या संमतीनंतर घेतलेला हा निर्णय आहे.