शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: आसाम , बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (18:36 IST)

आसाममध्ये 100 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटींची टक्कर झाल्यानंतर अनेक जण बेपत्ता

आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर भीषण बोटीचा अपघात झाला आहे. येथे प्रवाशांनी भरलेल्या दोन बोटींची टक्कर झाली. अपघातानंतर अनेक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. ही घटना जोरहाट जिल्ह्यातील निमतीघाट येथून नोंदवण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बोटींमध्ये सुमारे 100 प्रवासी होते. एक बोट माजुलीहून निमतीघाटाकडे जात होती तर दुसरी बोट विरुद्ध दिशेने जात होती.
 
राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी बोट दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि माजुली आणि जोरहाट जिल्हा प्रशासनांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने बचावकार्य करण्याचे निर्देश दिले. त्यांनी आपले मंत्री बिमल बोरा यांना लवकरच माजुलीला पोहचून परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे प्रधान सचिव समीर सिन्हा यांना सतत घडामोडींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्या माजुलीला पोहोचतील.