यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. सोबतच एल निनोचा प्रभाव कमी राहण्याचा अंदाज असल्यानं पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ९६ ते १०४ टक्के पाऊस म्हणजे सरासरी पावसाचं परिमाण आहे. दुसरीकडे हवामान विभागाच्या चांगल्या पावसाच्या अंदाजानंतर शेअर बाजारानंही उसळी घेतली आहे. बाजार उघडताच शेअर बाजार 160 अंकांनी वधारला आणि त्यानं 30 हजारांचा टप्पा पार केला. चांगल्या पावसाच्या या बातमीमुळे बाजारात आनंदाचं वातावरण आहे.