रविवार, 23 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 (21:19 IST)

दिल्लीतील रोहिणी परिसरातील मंदिरात लागलेल्या भीषण आगीत पुजाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Delhi News: दिल्लीतील रोहिणी परिसरातील एका मंदिरात शनिवारी लागलेल्या भीषण आगीत ६५ वर्षीय पुजारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग लागली तेव्हा ते  मंदिरात अडकले होते.  
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील रोहिणी परिसरातील एका मंदिरात शनिवारी लागलेल्या भीषण आगीत एका पुजाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या अपघातात मंदिराचा पुजारी भाजला आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पुजाऱ्याची ओळख ६५ वर्षीय पंडित बनवारीलाल शर्मा अशी झाली आहे. आग लागली तेव्हा पंडित बनवारीलाल शर्मा मंदिरात अडकले होते आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला असे त्यात म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली, परंतु शर्मा आत बेशुद्ध अवस्थेत आढळले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या शर्माला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या तपासात खोलीत सुरू असलेल्या हीटरमुळे आग लागल्याचा संशय आहे.
Edited By- Dhanashri Naik