माजी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्ती
Former RBI Governor Shaktikanta Das News: आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दास हे तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या जवळचे मानले जात होते. जेटली यांनी अनेक वेळा त्यांचे कौतुक केले होते.
कोण आहेत शक्तिकांत दास?
शक्तिकांत दास यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९५७ रोजी झाला. ते दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदव्युत्तर आहे. त्यांनी इतिहासात एमए केले आहे. ते तामिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी आहे. तसेच त्यांनी भारताचे आर्थिक व्यवहार सचिव, भारताचे महसूल सचिव आणि भारताचे खत सचिव म्हणूनही काम केले आहे.
शक्तिकांत दास यांना प्रशासनाच्या विविध क्षेत्रात मोठा अनुभव आहे आणि त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वित्त, कर, उद्योग इत्यादी क्षेत्रात महत्त्वाची पदे भूषवली आहे. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत, ते 8 केंद्रीय अर्थसंकल्पांच्या तयारीशी थेट जोडले गेले आहे.
Edited By- Dhanashri Naik