अशा बातम्या फक्त मनोरंजन म्हणून सोडून द्या - भागवत
राष्ट्रपतीपदासाठी माझ्या नावाची चर्चा केवळ माध्यमांमध्ये असून अशा बातम्या फक्त मनोरंजन म्हणून सोडून द्या. आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही, पद मिळाले तरी स्वीकारणार नाही असे सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात येतानाच आपण राजकारणाचे सर्व दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे राजकारणाचा संबंध दूरदर पर्यंत नाही असे असेही मोहन भागवत म्हणाले.