शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 24 जुलै 2022 (12:21 IST)

Monkey pox Case: दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण

monkey pox
देशाची राजधानी दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. दिल्लीत पहिला रुग्ण आढळल्याची पुष्टी आरोग्य मंत्रालयाने केली आहे. हा रुग्ण मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल आहे.
 
कोणताही प्रवास इतिहास नसलेल्या 31 वर्षीय पुरुषाला ताप आणि त्वचेवर जखम झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतातील या आजाराची ही चौथी घटना आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, हा माणूस नुकताच हिमाचल प्रदेशातील मनाली येथे एका पार्टीत सहभागी झाला होता.
 
पश्चिम दिल्लीतील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागल्याने सुमारे तीन दिवसांपूर्वी येथील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे नमुने शनिवारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) पुणे येथे पाठवण्यात आले, त्यानंतर नमुने पॉझिटिव्ह आढळले. रुग्णाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याआधी शुक्रवारी मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळून आला होता
केरळमध्ये तीन प्रकरणे समोर आली आहेत.
 
तज्ञांच्या मते, मंकीपॉक्स विषाणू खूप वेगाने बदलतो परंतु या संसर्गावर उपचार केले जाऊ शकतात.लक्षणांनुसार उपचार बदलतात.त्यांनी सांगितले की संसर्गाची सुरुवात ताप, डोकेदुखी आणि फ्लूने होते.जसजसा संसर्ग तीव्र होतो तसतसे शरीरावर लाल फोड दिसतात, जे कांजिण्यासारखे खाजलेले असतात.विषाणूचा इनक्यूबेशन कालावधी पाच ते21 दिवसांचा असतो. 
 
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले.युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने म्हटले आहे की 74 देशांमध्ये त्याचा प्रसार ही 'असाधारण' परिस्थिती आहे.मे पासून, जगभरात मंकीपॉक्सची 16,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.