शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (17:03 IST)

आई वडील सेल्फीच्या नादात, ३ वर्षाची मुलगी बुडाली

सेल्फीच्या नादात सूरतमधील एका दाम्पत्याने पोटच्या ३ वर्षांच्या चिमुरडीला गमवावं लागल आहे. हे दाम्पत्य शुक्रवारी अल्थान गार्डनमध्ये आपल्या दोन मुलांना घेऊन फिरायला गेले होते. दोन्ही मुलं खेळत असल्याचं बघून हे दाम्पत्य सेल्फी काढण्यात मग्न झाले. मात्र सेल्फी काढून झाल्यावर त्यांना एकच मूल तिथे दिसले. ३ वर्षांची चिमुरडी तिथे नव्हती. त्यानंतर मुलीची शोधाशोध सुरू केली. पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार केली.
 
त्यानंतर गार्डनमधील एका तळयाजवळ त्यांना मुलीचा एक बूट सापडला. त्यामुळे पोलिसांना संशय आला. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी तळ्यात मुलीचा शोध घेतला असता मुलीचा मृतदेह तळ्यात सापडला.