रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (23:04 IST)

.खासदार प्रज्ञासिंह ठाकूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांना शहरातील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ठाकूर यांच्या कार्यालयाने दिली.
 
एका महिन्यात रुग्णालयात दाखल करण्याची ही दुसरी वेळ आहे. १ फेब्रुवारीला त्यांना अशाच मुद्द्यांसाठी नवी दिल्लीतील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थान (एम्स) येथे नेण्यात आले. यापूर्वी, कोविड-१९ ची लक्षण दिसू लागल्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये त्यांना एम्समध्ये दाखल केले गेले होते. २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील त्या प्रमुख आरोपी आहेत. या दुर्घटनेत १० लोक ठार आणि अनेकजण जखमी झाले होते. त्यांना २०१७ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोग्याच्या कारणावरून जामीन मंजूर केला होता.