तामिळनाडू भाजपने राहुल गांधींवर निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन करण्याचा आरोप केला
काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी आचार संहितेचे उल्लंघन करण्याचा आरोपाखाली राज्यात प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी भाजपच्या तामिळनाडू युनिटने गुरुवारी निवडणूक आयोगाला विनंती केली. तामिळनाडूमध्ये 6 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
भाजपने आयोगाला विनंती केली आहे की 'तरुणांना दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यात प्रवृत्त करण्यासाठी गांधी विरुद्ध एफआयआर नोंदविण्यास निर्देश द्यावेत.
भाजपच्या राज्य निवडणूक व्यवस्थापन समिती प्रभारी व्ही. बालकृष्णन यांनी आरोप लावला आहे की 1 मार्च रोजी कन्याकुमारी जिल्ह्यातील मुळगूंमुदु येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयात गांधींचा निवडणूक कार्यक्रम आयोजित करणे हे आचार संहितेचे उल्लंघन आहे.
बालकृष्णन यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकारी सत्यव्रत साहू यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की , शैक्षणिक संस्थेत गांधींची निवडणूक मोहीम ही आचारसंहितेच्या तरतुदीचे उल्लंघन करीत आहे.त्या मुळे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांच्या वर तामिळनाडूमध्ये प्रचाराला बंदी घालण्याची गरज आहे.