मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (17:53 IST)

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चंटसोबतचा साखरपुडा सोहळा झाला साजरा

anant radhika
मुंबई प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा आज राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथ मंदिरात शीला आणि वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट यांच्याशी  साखरपुडा झाला. या जोडप्याच्या या समारंभातील पहिले चित्र समोर आले आहे.
   
साखरपुडा नंतर दोघेही श्रीनाथ मंदिरातील राजभोग सोहळ्यात उपस्थित झाले. यावेळी दोघांच्या कुटुंबीयांसह त्यांचे जवळचे मित्रही उपस्थित होते.
 
अनंत आणि राधिका अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. राधिका लवकरच अंबानी कुटुंबाची धाकटी सून होणार आहे. दोन्ही कुटुंबे राधिका आणि अनंतसाठी सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेऊ इच्छित आहे.  
anant radhika
अनंतने यूएसए मधील ब्राउन युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि तेव्हापासून तो जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डाचा सदस्य म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित आहे. ते सध्या RIL च्या ऊर्जा व्यवसायाचे प्रमुख आहेत. राधिका न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवीधर आहे आणि एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते.
Edited by : Smita Joshi