सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (21:32 IST)

परमबीर सिंग लवकरच चौकशीला सामोरं जाणार, स्वत: परमबीर सिंग यांची माहीती

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग लवकरच चौकशीला सामोरं जाणार आहे. परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत.  लवकरच चौकशीसाठी मुंबईला येणार असल्याचं स्वत: परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. 
 
परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परमबीर सिंग जर न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला होता. गोरेगावच्या एका प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते, मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते.