गंभीर गुन्ह्यांबाबत पाटणा, लखनऊला नागपूरने मागे टाकले  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  नागपुरनं गंभीर गुन्ह्यांबाबत पाटणा, लखनऊ या शहरांनाही मागे टाकलं आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नव्या अहवालात हे दिसून आलं आहे. दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या गुन्ह्यात नागपूरने देशात पहिला क्रमांक आहे. 
				  													
						
																							
									  
	 
	राज्याची उपराजधानी नागपूर गेल्या काही वर्षांमध्ये गंभीर गुन्ह्यांमुळं सतत चर्चेत  आहे. 2014 ते 2020 पर्यंत पासून राज्याचं गृहमंत्री नागपुरचे होते. मात्र शहरात  गुन्हेगारीला लगाम मात्र लागला नाही. नॅशनल क्राईम रिकॉर्ड ब्युरोच्या नव्या अहवालानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात नागपूर देशात टॉपवर आहे. 
				  				  
	 
	नागपुरात 2020 मध्ये हत्येच्या 97 घटना घडल्या. नागपूर पेक्षा जास्त हत्या झालेल्या शहरांमध्ये दिल्ली, बंगळूरु, चेन्नई, मुंबई, सुरत शहरांचा समावेश आहे. मात्र, नागपूरच्या तुलनेत या सर्व शहरांची लोकसंख्या जास्त आहे. काही शहरांत तर ती दुप्पट किंवा तिप्पट आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या  2020 वर्षाच्या गुन्हे विषयक अहवालानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे नागपुरात हत्येच्या प्रकरणाचे दर 3.9 इतका असून हा देशात सर्वाधिक आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	या अहवालानुसार 2020 मध्ये बिहारची राजधानी पाटणा मध्ये हत्येची 79 प्रकरणं नोंदवली गेली असून दर एक लाख लोकसंख्या प्रमाणे पाटण्यात हत्येचा दर 3.84 आहे. म्हणजे नागपुरनं हत्येच्या घटनांमध्ये पाटण्यालाही मागे टाकले आहे. गेल्यावर्षी यासंदर्भात नागपूरचं स्थान पाटण्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर होतं.