1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (12:24 IST)

काँग्रेस संस्कृतीमुळे देशाचे मोठे नुकसान

narendra modi
काँग्रेस सरकारच्या अटकवण्याच्या, लटकवण्याच्या आणि भटकवण्याच्या संस्कृतीमुळे देशाचे भरपूर नुकसान झाले आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. हरियाणाला दिल्लीशी जोडणार्‍या एक्स्प्रेस वेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.
 
हरियाणाला दिल्लीशी जोडणार्‍या केएमपी एक्स्प्रेस वेचे मोदी यांनी उद्‌घाटन केले. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही उपस्थित होते. 12 वर्षे जुन्या या प्रकल्पामुळे दिल्ली-हरियाणा हायवेवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. जड वाहनांची या हायवेमुळे भरपूर सोय होणार आहे. यावेळी या प्रकल्पाबद्दल बोलताना मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. हा हायवे 12 वर्षे जुना आहे. 
 
राष्ट्रकुल स्पर्धांच्यावेळी हा लोकांना वापरता येईल असे ध्येय समोर ठेवून या एक्स्प्रेस वेची र्नितिी सुरू करण्यात आली होती. पण राष्ट्रकुल स्पर्धांची ज्याप्रकारे दुर्दशा झाली तशीच या रस्त्याची दुर्दशा झाली. या प्रकल्पाची सुरुवात झाली तेव्हा त्याची किंमत 1200 कोटी होती आता तीच किंमत तिप्पट झाली आहे असेही मोदी म्हणाले. तसेच यावेळी इतर विकासकामांचाही त्यांनी उल्लेख केला आहे.