बुधवार, 16 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:16 IST)

पुलवामा हल्ल्याचे सत्य जनतेला जाणून घ्यायचे आहे - नवाब मलिक

पुलवामा हल्ल्याचं सत्य देशातील जनतेला जाणून घ्यायचे आहे त्यामुळे या हल्ल्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
 
पुलवामा हल्ल्यात आपले सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात आजपर्यंत आरडीएक्स कुठुन आले आणि वाहन घटनास्थळावर कसे पोहोचले याची चौकशी करण्यात आलेली नाही असेही नवाब मलिक म्हणाले. लोकांना सत्य जाणून घ्यायचे असेल म्हणून चौकशी केली पाहिजे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.