शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 19 जानेवारी 2019 (12:54 IST)

बोस कुटुंबीयांना पीएमओचे 7 दूरध्वनी

कोलकाता- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील 64 कागदपत्रे प्रसिद्ध करण्याच्या पश्चिम बंगालमधील सरकारच्या निर्णयानंतर बोस यांच्या कुटुंबीयांना गेल्या आठ दिवसांत पंतप्रधान कार्यालयामधून (पीएमओ) किमान सातवेळा दूरध्वनी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील चर्चेमध्ये उल्लेख केल्या जाणार्‍या मुद्यांच्या निश्चित आखणीसाठी हे दूरध्वनी करण्यात आले आहेत. बोस कुटुंबीय पंतप्रधानांची येत्या 14 ऑक्टोबर रोजी भेट घेणार आहेत. या भेटीच्या पूर्वतयारीसाठी पीएमओ प्रयत्नशील आहे. 
 
नेताजींचे पणतू चंद्र बोस यांना पंतप्रधानांबरोबरील या भेटीसाठी बोस कुटुंबीयांतर्फे उपस्थित राहणार्‍या सदस्यांची यादी पाठविण्यास पीएमओतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच या भेटीचा निश्चित अजेंडा ठरविण्यासंदर्भातील आवाहनही पीएमओकडून करण्यात आले आहे. यावेळी होणार्‍या या भेटीसंदर्भात पंतप्रधानही अत्यंत गंभीर असल्याचे दिसून आले आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व केंद्रीय गृहसचिवांना बोलाविले जाण्याची शक्यता असल्याची कल्पनाही पीएमओमधील अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.