Dharma Sangrah

रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आधार नंबरची गरज नाही

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (09:32 IST)

रेल्वे तिकीट बुकिंग करताना, आधार नंबर गरजेचा नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना, याबाबतची माहिती दिली.

गोहेन म्हणाले की, रेल्वे तिकीट बुकींगसाठी 12 अंकी अधार नंबर बंधनकारक करण्याचा कोणताही प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाच्या विचाराधीन नाही. पण तरीही या वर्षीच्या जानेवारीपासून आधारच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावरील सवलत मिळवण्यासाठी आधार कार्डची पडताळणी गरजेची असल्याचंही स्पष्ट केलं.  तसेच दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना गोहेन म्हणाले की, पॅरिस करारान्वये, भारतातील प्रदूषणसंदर्भातील उत्सर्जन कमी करण्यासाठी लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. त्यात उत्सर्जन कमी करण्यासाठी रेल्वे विभागाचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

पुढील लेख
Show comments