1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 20 मार्च 2022 (16:45 IST)

आता विना रेशन कार्ड धान्य मिळणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा

आता रेशन कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कडे रेशन कार्ड असण्याची गरज नाही. ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत स्पष्ट केले की, एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्यासोबत शिधापत्रिका बाळगण्याची गरज नाही. गोयल म्हणाले की, लाभार्थी देशात कुठेही त्याच्या आवडीच्या रास्त भाव दुकानात त्याचा शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून धान्य घेऊन शकतो.
 
गोयल म्हणाले की, तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येत असून याअंतर्गत वन नेशन, वन रेशन कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. ते म्हणाले, “सध्या एक राष्ट्र, एक शिधापत्रिका योजना देशातील 35 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली असून सुमारे 77 कोटी लाभार्थी (सुमारे 96.8 टक्के) आहेत.
 
केंद्रीय मंत्री म्हणाले की, देशात कुठेही, आपल्या आवडीच्या स्वस्त भाव दुकानात आपला रेशन कार्ड नंबर किंवा आधार क्रमांक टाका आणि धान्य घ्या. ते म्हणाले की जर एखाद्याला संपूर्ण रेशन एकाच वेळी घ्यायचे नसेल तर तो रेशन वेळो-वेळी घेऊ शकतो. तंत्रज्ञान या प्रणालीशी जोडल्यानंतर नवीन कार्डाची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
गोयल म्हणाले, “एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेचा लाभ घेण्यासाठी, लाभार्थींना त्यांच्यासोबत रेशनकार्ड बाळगण्याची गरज नाही आणि त्यांना त्यांचे रेशनकार्ड देशात कुठेही त्यांच्या आवडीच्या रास्त भाव दुकानातून मिळू शकते. क्रमांक किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे.