शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ओम पुरी यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने नाही: पोस्टमार्टम अहवाल

अभिनेते ओम पुरी यांच्या पोस्टमार्टम अहवालानुसार पुरी यांच्या डोक्याला जखम झाली असून त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने नव्हे, तर घातपाताने झाल्याची शक्यता वाढली आहे. अभिनेते ओम पुरी यांचे  6 जानेवारीला मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुरी यांचे  निधन झाल्याचा अंदाज  व्यक्त करण्यात आला.

पोलिसांनी ओम पुरी यांच्या घराचा पंचनामा केला. प्राथमिकदृष्ट्या ओम पुरी यांचा मृत्यू नैसर्गिक वाटत असला तरी या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरु केली. पुरी यांच्या डोक्याच्या मागच्या बाजुला दीड इंच खोल आणि चार इंच लांब खोक पडली होती. पोस्टमार्टम अहवालात पुरी यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचं समोर आले आहे.