ओमर अब्दुल्ला यांनी पहिल्या पत्नीकडे मागितला घटस्फोट
जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहिल्या पत्नीकडे घटस्फोट मागितला आहे. त्यामुळे अब्दुल्लांनी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने ओमर यांची विभक्त पत्नी पायल यांना दिले आहेत. अब्दुल्ला यांना पुन्हा लगीनगाठ बांधण्याची इच्छा आहे. 'आमचा तुटलेला संसार कधीच जुळवता येऊ शकत नाही' असं ओमर अब्दुल्लांनी घटस्फोटाच्या अर्जात म्हटलं होतं.
1 सप्टेंबर 1994 रोजी ओमर अब्दुल्ला आणि पायल यांचं लग्न झालं होतं. ओमर अब्दुल्ला आणि पायल यांच्या नात्यात 2007 मध्ये कटुता आली होती. 2009 पासून दोघं विभक्त राहायला लागले. ओमर आणि पायल यांना दोन मुलं असून ती आईसोबत राहतात.