मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 जून 2023 (13:36 IST)

लग्नाच्या सातव्या दिवशी नववधू बॉयफ्रेंड सोबत दागिने घेऊन पसार

bride along with her boyfriend take jewels
एका तरुणाने लग्न करून नवरीला घरात आणले मात्र लग्नानंतर त्यांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.  उत्तर प्रदेशातील बांदा येथे नववधू लग्नाच्या नंतर माहेरी जाण्याचे सांगून गेली आणि दागिने घेऊन बॉयफ्रेंड सोबत पसार झाल्याची घटना समोर आली आहे. 

31 मे रोजी मुलीचे लग्न झाले होते, त्यानंतर ती आपल्या कुटुंबीयांना भेटण्याच्या बहाण्याने तिच्या माहेरी आली होती.पण तिचा काही वेगळाच प्लॅन होता. घरच्यांना काही सामान घ्यायचे आहे असे सांगून ती बाजाराकडे निघाली. त्यानंतर ती तिथून प्रियकरासह पळून गेली. 
 
तिने घरातून दागिने आणि रोख रक्कमही नेली आहे. मुलगी घरी न परतल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी मुलीला फोन केला पण स्वीच ऑफ येत होता. त्यानंतर ... नातेवाईकांसह वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. परंतु  नववधू बद्दल काहीच कळू शकले नाही. 
 
नंतर कळले की मुलगी तिच्याच भावाच्या सासरच्या नातेवाईकासोबत पळून गेली होती. व्यथित झालेल्या वडिलांनी दोन तरुणांची नावे घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.  आपल्या मुलीला फसवून तिला पळवून नेल्याचे वडिलांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला.
 
सदर प्रकरण नरेंनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी मुलीचे लग्न 31 मे रोजी कालिंजर या भागात लावून दिले. लग्नाच्या सात दिवसानंतर 6 जून रोजी मुलगी माहेरी आली नंतर 11 जून रोजी बाजारातून काही सामान आणायचे आहे असे सांगून घरातून निघाली तर ती परतलीच नाही. घरातून निघताना तिने रोख रक्कम आणि दागिने देखील सोबत नेल्याचे वडिलांना समजले. मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळाली आहे. तिचा प्रियकर तिच्या भावाच्या सासरचा नातेवाईक आहे.

मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून पोलिसांनी तक्रार नोंदवून तिचा शोध घेत आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत मुलीचा शोध घेऊन तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले.  
 
Edited by - Priya Dixit