मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 2 मे 2018 (10:33 IST)

रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग साईट 6 तास बंद राहणार

आयआरसीटीसी ही रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग साईट सहा तास बंद राहणार आहे. 2 मे रोजी रात्री 10.45 वाजल्यापासून 3 मे रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत वेबसाईट बंद राहील. त्यामुळे या काळात ऑनलाईन तिकीट बुक करता येणार नाही. या काळात आयव्हीआरएस टच स्क्रीन, कॉल सेंटर आणि रेल्वे फोन नंबर 139 या माध्यमातून  रेल्वेशी संबंधित माहिती मिळू शकेल.  
 
रेल्वेच्या पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टमला (पीआरएस) अपडेट केले जाणार असल्याने वेबसाईट सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग अधिक अद्ययावत करण्यासाठी ऑनलाईन सिस्टममध्ये काही नवीन फीचर्स समाविष्ट केले जातील.