1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 डिसेंबर 2021 (07:32 IST)

दिल्लीत मोर्चेबांधणीशरद पवार, सोनिया गांधी, संजय राऊत आदींच्या उपस्थितीत उद्या पुन्हा चर्चा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अस्तित्वावरुन जोरदार चर्चा झडायला सुरुवात झाली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांचा काँग्रेस विरोध शिवसेनेला मान्य नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. 
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथवरील निवासस्थानी पार पडेलल्या या बैठकीला स्वत: सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचूरी, शिवसेना खासदार संजय राऊत आदी उपस्थित होते. ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना बॅनर्जी यांनी पवारांसमोरच राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसंच यूपीए कुठे आहे? असा सवालही केला होता. बॅनर्जींच्या या बैठकीनंतर यूपीएबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यानंतर  झालेल्या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.
 
दरम्यान बैठक ही पूर्वनियोजित होती. ही बैठक बंद दाराआड होती. राजकीय स्वरुपाची बैठक असली तरी अनेक गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत. पुढे काय करता येईल, काय रणनिती ठरवता येईल, याबाबत आम्ही बोललो. शिवसेनेच्या वतीनं मी उपस्थित होतो. खरं म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं होतं. उद्धवजींनी यावं असा त्यांचा आग्रह होता. पण उद्धवजी सध्या प्रवास करु शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी मला जाण्यास सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी या बैठकीनंतर दिली आहे.