रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मार्च 2017 (15:24 IST)

शशिकला टोपी, पनीरसेल्वम यांना विजेचा खांब

जयललितांच्या निधनामुळे तामिळनाडूमधील आर. के. नगरमधल्या जागेवर 12 एप्रिलला पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्या निमित्तानं पुन्हा एकदा अण्णाद्रमुकमधले शशिकला आणि पनीरसेल्वम गट आमने-सामने आले होते. दोन्ही गटांनी अण्णाद्रमुकच्या चिन्हावर दावा केला होता. त्यावेळी निवडणूक आयोगानं ते चिन्हच गोठवलं होतं. आता निवडणूक आयोगानं शशिकलांच्या गटाला टोपी(hat), तर पनीरसेल्वम यांच्या गटाला विजेचा खांब (electricity pole) ही चिन्हांचं वाटप केलं आहे. तसेच निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना वेगवेगळे नाव देण्यास मंजुरी दिली आहे. शशिकलांच्या गटाला ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र अम्मा(एआईएडीएमके अम्मा) तर पनीरसेल्वम यांच्या गटाला एआईएडीएमके पुराट्ची थलैवी अम्मा हे नाव बहाल करण्यात आलं आहे. दोन्ही गटांनी अण्णाद्रमुकच्या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानं ते चिन्हच गोठवलं होतं.