रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (17:12 IST)

अशी झाली ‘बाहुबली सर्जरी’

आंध्र प्रदेशमधील गुंटूर शहरातील तुलसी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अनोखी शस्त्रक्रिया पार पडली. नाव पडल ‘बाहुबली सर्जरी.’   यात डॉक्टर शस्त्रक्रिया करत असताना रुग्ण चक्क ‘बाहुबली २’ चित्रपट पाहत होती.

व्यवसायाने नर्स असलेल्या ४३ वर्षीय विनया कुमारी यांना ब्रेन ट्युमर झाला होता. काही दिवसांपूर्वी चक्कर येऊन त्या पडल्या. तपासणी केल्यानंतर ब्रेन ट्युमर झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यांच्यावर गेल्या आठवड्यात ९० मिनिटांची शस्त्रक्रिया करण्यात आली. तुलसी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील न्यूरोसर्जनच्या टीमने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान विनया यांनी शुद्धीत राहणं जास्त गरजेचं होतं, तेव्हा तिचं मन गुंतवून ठेवण्यासाठी डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये चक्क बाहुबली चित्रपट दाखवला. यासाठी तिच्या बेडवर लॅपटॉपची व्यवस्था करण्यात आली होती. तिच्या योग्य प्रतिसादामुळे डॉक्टरांच्या चमूला तिच्यावर उपचार करणं अधिक सोपं गेलं.